Tuesday, March 16, 2010

सर्वानां नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


आपण सर्वानां नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
 

या मुहुर्तावर माझ्या "वर्षा" कडुन (ही मुंबई ची - आणि दिल्लीच्या मोठ्या "वर्षा" कडुन ही)  काही अपेक्षा...  
  • फक्त तुमचेच नाही तर सगळ्या भारतवर्षाचे नविन वर्ष सुखाचे, समृध्दीचे आणि भरभराटी चे जावो ..
  • साखर सर्वाच्या खिश्याला परवडू द्या... (डायबिटीज चे नंतर बघु.. आधी खाउ तरी द्या रे), आणि जरा शेतकर्‍यांना पण फ़ायदा मिळु दया
  • गरीब जनतेला रोज तुरडाळी चे वरण परवडू द्या....(हरभरा डाळीची आम्ही भजी काढु.. वरण नको)
  • "नो पार्कींग " मध्ये गाडी लावणे हा ऎकंमेव नियम नाहीये तेव्हा वाहतुक पोलिसांनी "नो पार्कींग" मधील गाड्या उचलण्या पेक्षा जे शुरवीर इतर नियम मोडतात त्याच्या वर जर काही कारवाई केली तर बरेच अपघात कमी होतील...
  • थिल्लर आणि उथळ चित्रपटांना संरक्षण देण्या पेक्षा जरा हुतात्म्यांच्या घरा कडे जरा लक्ष द्या. जास्त खर्च नाही येत, तुम्ही दोन दिवस कामकाज तहकुब करुन जे काही पैसे व्यर्थ घालवता, त्यात बर्‍याच गोष्टी होतील.
  • २०% लोकांच्या मतांसाठी शहर विकायला नका काढु, मुंबई चे शांघाई करण्यापेक्षा इतर शहरांच का नाही मुंबई करत?
  • जयंत्या साजर्‍या करा, पण त्याबरोबर त्या महापुरुषाचा एक तरी चांगला गुण अंगिकारुन दाखवा
  • निदान या वर्षीतरी महिलांना ३३% आरक्षण द्या.. उगाच त्याला "विचाराधीन" आणि  वादग्रस्त मुद्दा म्हणुन बगल देउ नका.
  • सकाळी बाहेर पडलेला संध्याकाळी सुखरुप परत येणार याची खात्री द्या.
  • माझ्या सारख्या सामान्या ला ही शाश्वती द्या कि पुढील वर्षी मी पुन्हा सर्वांना हसत मुखाने नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देणार... (हे करा ते करा पेक्षा अस आम्ही सुचविण्या पेक्षा कधी तरी आम्हाला "किप ईट उप" म्हणण्याची संधी द्या )

आता जरा वैयक्तिक (या अपेक्षा आणि "वर्षा" याचा काडीमात्र संबध नाही आहे याची नोंद घ्यावी)

  • या नविन वर्षी सगळ्यानां चांगली हाइक मिळावी.
  • या नविन वर्षी सगळ्यानां भेदभाव न होता प्रमोशन मिळावे.
  • मला भरपुर किल्ले सर करण्याची शक्ती मिळावी.
  • सर्वांची घर, लग्न, कंपनी स्विच सारखी तुंबलेली कामे मार्गी लागावी.
चांगभल.......
blog comments powered by Disqus