Friday, February 12, 2010

एक नवीन विनोदी मालिका

होय, सध्या एक नवीन भन्नाट विनोदी मालिका सुरु झाली आहे, तिच नाव आहे "राहुल का स्वयंवर" अरर...चुकल .. स्वयंवर नही शादी....
जर तुम्ही राखि का स्वयंवर हा या विनोदी मालिकेचा जुना अध्याय पहिला असाल तर असे कळुन येइन की या वेळीच्या स्पर्धकांचा दर्जा म्हण्जे काय?? (इथे मला काय म्हणायच आहे हे जाणुन घ्या).  पण याचा दोष त्याना न देता पारड दोन्ही कडे बरोबर झुकले आहे असा माझा समज आहे कारण तसाच तुल्यबळ प्रतिस्पर्धी त्यांच्या समोर उभा आहे ना.
मुली लग्नासाठी आल्या आहेत का हवा बदल करण्यासाठी हे कळायला वाव नाही. त्यांच्या बद्दल (त्यांना पाहु्न आणि त्यांची उत्तरे ऎकुण) जास्त लिहिण्या सारख काही मला तरी वाटल नाही.
जास्त seriously पाहु नका,  मजा येणार नाही, मोकळ्या मनाने हसता येणार नाही.


अस एकण्यात आल आहे कि याच्या पुढिल  अध्यायात संभावना सेठ च लग्न संभव करायचा NDTV Imagine  चा बेत आहे.या वाहिनी ला मात्र मी मानतो बर..त्यानी  अशक्य (असंभव ) गोष्टी शक्य (संभव )करण्याचा जणु विडाच हाती घेतला आहे.



चांग भल.
blog comments powered by Disqus