माझ्या तमाम मित्रांना एक विशेष बातमी.
कळविण्यास अत्यन्त आनंद आहे की मला अखिल भारतीय तरुण गॄह कर्ज विळखा संघटने चे पुढील १५ वर्षां साठी सदस्यत्व मिळाले आहे कारण मी निर्माण विवा या गॄह मध्ये एक सदनिका आरक्षित केली आहे. आता काही जण
अशी शंका काढ्तील कि हे सर्व मी मातृभाषे मध्ये का लिहितो आहे तर त्यांस कारण असे कि, माणुस कितीही
इंग्रजाळ्ला (जसे आपण माणसांच्या (सवयींच्या ?? ) आहारी गेलेल्या प्राण्याला माणसाळलेला म्हणतो, त्याच प्रमाणे
मी माझ्या शब्द्कोशात "इंग्रजाळ्ला" हा शब्द जोडला) पण ठेच लागली कि तो मातृभाषेतच विव्हळतो आणि मला
ही नविन सदस्यत्व मुळे अशीच ठेच लागणार आहे म्हणुन हा मातृभाषेतच लेख लिहिण्याचा अट्टहास. (खर सांगायच
झाल तर इंग्रजी भाषेत लेख लिहिण्या मागे माझ एकच ध्येय आहे , "गरिबी हटवा" . मला काय म्हणायचे आहे याचा माझ्या जवळच्या मित्राना अंदाज आला असेल)
आणि जर तुमच्या मनात राम शुदध मराठी का लिहित आहे असा प्रश्न पडला असेल तर त्याला उत्तर असे कि काही
दिवसां पासुन रोज संध्याकाळी काही मित्र मला चावतात ( "चावतात " या शब्दा चा अर्थ जर लागत नसेल तर …., मानसिक छळाला पुणेरी बोली भाषे मध्ये चावणे असे म्हणतात. या वाक्यात पुणेरी शब्द आल्या मुळे सर्व जण सहमत
होतीलच असे नाही. नाही झाले तरी चालेल, ही माझी पुणेरी बोली आहे.)
असो.. पुढील महिन्या पासुन सुलभ मासिक हप्ते सुरु होणार आणि माझ्या हातात फ़क्त अर्धा पगार पडणार
ताबा पुढील काही महिन्यात मिळेल.
बरच काहि लिहायचे होते मला, पण आत्ता सगळय आठवत नाहीये (उशिर झाला आहे ना… EOD कधिच
झालाय)
आपण आपला अभिप्राय नक्की कळवा, मला पुढिल लेख लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल.
चुक भुल द्यावी घ्यावी.
Pandavgad Trek
14 years ago